दत्ता सामंत यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नेते निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.
मालवण | प्रतिनिधी : भाजप नेते दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री धनुष्यबाण हाती घेत शिवससेनेत प्रवेश केला. त्यांच्या समवेत असंख्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत निलेश राणे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निश्चय मुख्यमंत्र्यांच्या समोर व्यक्त केला.
शनिवारी दत्ता सामंत यांनी भाजप नेते खासदार नारायण राणे यांचे भेट घेत आपण राणे कुटुंबीय यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा पक्षप्रवेश रविवारी सकाळी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र, शनिवारी रात्रीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी निलेश राणे, रवी फाटक, बाळ चिंदरकर उपस्थित होते. प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये राजा गांवकर, अनिल कांदळकर, जेराॅन फर्नांडिस, संतोष साटविलकर, मंदार लुडबे, सुनील घाडीगांवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)