ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार नितेश राणे २८ रोजी कणकवलीत भरणार विधानसभा उमेदवारी अर्ज.

आमदार नितेश राणे २८ रोजी कणकवलीत भरणार विधानसभा उमेदवारी अर्ज.

प्रकाशन: 27 Oct 2024 01:19 PM
वाचन संख्या 93

कणकवली | ब्यूरो न्यूज : भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे हे सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सोमवारी सकाळी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीने गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय असे निघणार आहेत. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करून उप जिल्हा रुग्णालय कणकवली समोरील मैदानात जाहीर सभा संपन्न होणार आहे.

यावेळी भाजपा खासदार नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, गोव्याचे मंत्री आणि कोकण प्रभारी विश्वजित राणे तसेच जिल्ह्यातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील भाजपा आणि महायुतीचे हितचिंतक तसेच जनता यांनी मोठ्या संख्येने यात सामील व्हावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स