संत रविदास भवन उभारण्यासाठी सर्व चर्मकार समाजबांधवांनी द्यावे यथाशक्ती योगदान.
ऍड.अनिल निरवडेकर यांचे कुडाळ येथील सभेत आवाहन
ब्युरो न्यूज | ओंकार चव्हाण : जिल्ह्यातील चर्मकार बांधवांच्या आस्थेचे व एक बहु उपयोगी आणि सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ संचलित नियोजित संत रविदास भवन भूमिपूजन सोहळा रविवार दि.31 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी हुमरमळा, ता.कुडाळ येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी कुडाळ शाखेच्या वतीने आयोजित सभेत जिल्हा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक ऍड.अनिल निरवडेकर यांनी समाजबांधवांना भवन निर्मितीसाठी सर्वानी उस्फुर्त हातभार द्यावा असे आवाहन केले. संत रविदास भवन निर्मितीचे चर्मकार समाजाचे स्वप्न असून ते साकार होताना प्रत्येकाने योगदान दयावे असे सांगितले.इमारतीबरोबरच वीज,पाणी,कुंपण या गरजा पूर्ण करण्याकरिता आर्थिक योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कुडाळ तालुकाध्यक्ष रामदास चव्हाण यांनीही तालुक्यातून भूमिपूजन सोहळ्यास लक्षणीय उपस्थिती ठेवणार असल्याचे सांगून कुडाळ तालुका भवन कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन केले.
संत रविदास भवन समिती प्रमुख श्रीराम चव्हाण यांनी आपण समिती प्रमुख म्हणून यापुढे सक्रिय योगदान देणार असल्याचे सांगून भवन निर्मितीचे काम एकजुटीने पूर्ण करूया असे आवाहन केले.
सदर सभेस जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पवार व लवू चव्हाण,भवन समिती कार्यवाह उदय शिरोडकर यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी राजन वालावलकर,मनोहर सरमळकर,संजय मुळदेकर,रत्नदीप जाधव,गुरुनाथ चव्हाण,नितीन बांबार्डेकर,गणपत चव्हाण संतोष चव्हाण हे तालुका व जिल्हा पदाधिकारी तसेच समाजबांधव उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कुडाळ सरचिटणीस सुभाष बांबुळकर यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)