ट्रक मोटारसायकलचा प्रचंड भीषण अपघात....!
तिवरे चव्हाणवाडी येथील दोन युवक ठार….!
कणकवली | उमेश परब : तिवरे- डामरे येथे ट्रक आणि मोटारसायकल च्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील दोघे युवक जागीच ठार झाले. विशाल गजानन चव्हाण (२२), सुरज रमेश चव्हाण (१९) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही तिवरे चव्हाणवाडी येथील रहिवासी आहेत. आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास डामरे टेंबली येथे हा अपघात घडला. ट्रक चालक संतोष हनुमंत चव्हाण आपल्या ताब्यातील (ट्रक क्र. MH04DD0257) हा ट्रक घेऊन तीवरे ते फोंडा असा प्रवास करत होता. तर अपघातात मृत पावलेले विशाल आणि सूरज हे युवक मोटरसायकल क्र. ( MH -07 – 7043 ) ने तिवरे च्या दिशेने जात होते. डामरे टेंम्बली च्या वळणावर ट्रक आणि मोटरसायकल ची समोरासमोर धडक बसली. या अपघातात ट्रक वर आदळून विशाल आणि सूरज हे ठार झाले. अपघातानंतर घटनास्थळावरून चालक संतोष याने पलायन करून कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाला. दरम्यान अपघातानंतर ट्रकचालकाने पलायन केल्यामुळे मयत युवकांचे नातेवाईक प्रचंड संतापले होते. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांना त्यांच्या उद्रेकाचा सहन करावा लागला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)