ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
हुमरमाळा येथील 'संत रविदास भवन' भूमिपूजन कार्यक्रम दिमाखात होणार संपन्न...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हुमरमाळा येथील 'संत रविदास भवन' भूमिपूजन कार्यक्रम दिमाखात होणार संपन्न...!

प्रकाशन: 23 Oct 2021 04:24 PM
वाचन संख्या 47

चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या तालुकावार सभा नियोजन

पोईप | ओंकार चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित नियोजित संत रविदास भवन भूमिपूजन सोहळा रविवार दि.31 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी हुमरमळा, ता.कुडाळ येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा मंडळाने तालुकावार सभा नियोजनाचे आवाहन तालुका शाखांना केले होते.यानुसार तालुकानिहाय सभांचे आयोजन करण्यात आले असून सदर सभांना जिल्हा पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.संत रविदास भवन निर्मितीचे चर्मकार समाजाचे स्वप्न असून सदर स्वप्नपूर्ती होत असल्याने समाजबांधवांमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण आहे.
तालुकावार सभांचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे.कुडाळ शाखा-शनिवार दि.23 रोजी सकाळी 10 वाजता,लिंगेश्वर प्रिंटर्स कुडाळ येथे मार्गदर्शक म्हणून ऍड.अनिल निरवडेकर(प्रमुख मार्गदर्शक),श्री.सुरेश पवार (जिल्हा उपाध्यक्ष),श्री.उदय शिरोडकर(भवन समिती कार्यवाह),सावंतवाडी शाखा-शनिवार दि.23 रोजी सायंकाळी 4 वाजता,सावंतवाडी डॉ.आंबेडकर समाजभवन येथे,मार्गदर्शक म्हणून ऍड.अनिल निरवडेकर(प्रमुख मार्गदर्शक ) श्री .लवू चव्हाण (जिल्हाउपाध्यक्ष),कणकवली शाखा रविवार दि.24 रोजी सकाळी 10 वाजता श्री.चंद्रकांत भोसले निवासस्थानी कणकवली येथे मार्गदर्शक श्री.सुजित जाधव(जिल्हाध्यक्ष),श्री.चंद्रसेन पाताडे(जिल्हा सरचिटणीस),श्री.सुधीर जाधव(भवन समिती सहप्रमुख),देवगड शाखा रविवार दि.24 रोजी दुपारी 12 वाजता श्री.प्रशांत मिठबांवकर यांचे निवासस्थानी मिठबांव येथे मार्गदर्शक श्री.सुजित जाधव(जिल्हाध्यक्ष),श्री.चंद्रसेन पाताडे(जिल्हा सरचिटणीस),श्री.नामदेव जाधव(जिल्हा कोषाध्यक्ष),मालवण शाखा रविवार दि.24 रोजी दुपारी 3 वाजता भवानी मंदिर नांदोस चव्हाणवाडी येथे मार्गदर्शक श्री.सुजित जाधव(जिल्हाध्यक्ष),श्री.चंद्रसेन पाताडे(जिल्हा सरचिटणीस),श्री.श्रीराम चव्हाण(भवन समिती प्रमुख),वेंगुर्ला शाखा रविवार दि.24 रोजी सायंकाळी 4 वाजता साई मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे मार्गदर्शक म्हणून ऍड.अनिल निरवडेकर(प्रमुख मार्गदर्शक),श्री.उदय शिरोडकर (भवन समिती कार्यवाह) अशाप्रकारे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष श्री.सुजित जाधव व जिल्हासरचिटणीस श्री.चंद्रसेन पाताडे यांनी दिली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स