ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज करणार दाखल.

२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज करणार दाखल.

प्रकाशन: 21 Oct 2024 02:44 PM
वाचन संख्या 84

जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन.

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आमदार वैभव नाईक आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी १० वाजता कुडाळ शहरातील अनंत मुक्ताई हॉल समोरील पटांगणावर त्यांची सभा होणार आहे. त्यानंतर सभा स्थळ ते कुडाळ बाजारपेठेतील एसटी स्टॅंड कडून पोलीस स्टेशन मार्गे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्या कार्यालयाकडे जात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, आप जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणेकर यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स