ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
उमेदवार कोण यापेक्षा महायुती मधिल प्रत्येक उमेदवार जिंकावा म्हणून श्री भराडी देवीकडे साकडे : भाजपा नेते रवींद्र चव्हाण.

उमेदवार कोण यापेक्षा महायुती मधिल प्रत्येक उमेदवार जिंकावा म्हणून श्री भराडी देवीकडे साकडे : भाजपा नेते रवींद्र चव्हाण.

प्रकाशन: 21 Oct 2024 01:39 PM
वाचन संख्या 220

भाजपा नेते रविंद्र चव्हाण यांचा आंगणेवाडीतील श्री भराडी देवीचा आशिर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ.

आंगणे ग्रामस्थांच्या वतीने नेते रवींद्र चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन सदिच्छा सत्कार.

मालवण | प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी आई भराडीचे दर्शन व आशिर्वाद घेऊन भाजपा नेते तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानसभा २०२४ च्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. आज २१ ऑक्टोबरला सकाळी, भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांनी भराडी देवी देवस्थानला भेट दिली व पूजा अर्चना करुन देवीकडे साकडे घातले. भाजपाच्या पहिल्या ९९ उमेदवारांच्या यादीत यादीत डोंबिवली विधानसभा मतदार संघातून भाजपा नेते रविंद्र चव्हाण हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी भास्कर आंगणे, बाळा आंगणे यांनी आंगणे कुटुंबीयांच्ये वतीने तथा ग्रामस्थांच्या वतीने ना. रवींद्र चव्हाण यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला. यावेळी आंगणेवाडी मंडळ अध्यक्ष सतिश आंगणे, सचिव अर्जुन आंगणे, सीताराम आंगणे, जयप्रकाश आंगणे, बालकृष्ण आंगणे, दत्तात्रय आंगणे, दीपक आंगणे, सुधाकर आंगणे, मंगेश आंगणे, जयंत आंगणे, आत्माराम आंगणे, नंदू आंगणे व आंगणे ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेते रविंद्र चव्हाण म्हणाले की भाजपाच्या केंद्र व राज्याच्या नेतृत्वाखाली आपण महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढत आहोत. उमेदवार कोण यापेक्षा महायुती मधिल प्रत्येक उमेदवार जिंकावा म्हणून श्री भराडी देवीकडे आपण साकडे घातले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेली श्री देवी भराडी आपल्याला निश्चितच यश देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती अत्यंत प्रबळ आहे. भाजपा, महायुतीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे निवडणुकीसाठी सज्ज आहेत.

यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बॅन्क संचालक बाबा परब, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, छोटू ठाकुर, महेश मांजरेकर, संतोष कोदे, महेश बागवे, बांबू आंगणे, भाजयुमोचे पदाधिकारी ललित चव्हाण व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स