ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
BSNL Live TV : सुरू झालीये BSNL लाईव्ह टीव्ही टेस्टिंग; कशी वापराल फ्री सुविधा,लगेच जाणून घ्या

BSNL Live TV : सुरू झालीये BSNL लाईव्ह टीव्ही टेस्टिंग; कशी वापराल फ्री सुविधा,लगेच जाणून घ्या

प्रकाशन: 11 Sep 2024 11:37 AM
वाचन संख्या 232

BSNL Live TV Service: BSNL ग्राहकांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. BSNL ने त्यांची नवीन लाईव्ह टीव्ही सेवा चाचणीसाठी सुरु केली आहे. विशेष म्हणजे, ही सेवा सध्या पूर्णपणे मोफत आहे. ही लाईव्ह टीव्हीची सुविधा मोफत असणार आहे आणि काही OTT प्लॅटफॉर्म हे अत्यल्प दरात उपलब्ध असणार आहेत.

या अगदी वेगळ्या आणि आकर्षक सेवेचा फायदा तुम्ही घेऊ शकता जर तुमच्याकडे BSNL ची FTTH इंटरनेट कनेक्शन आणि Android स्मार्ट टीव्ही (व्हर्जन 10 किंवा त्यापुढील) असेल. ही सेवा वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे पॅक घेण्याची गरज नाही. तुमच्या वैध असलेल्या FTTH प्लॅनमध्येच ही सेवा समाविष्ट आहे. त्यामुळे लगेचच अ‍ॅप डाउनलोड करा आणि मोफत लाईव्ह टीव्हीचा आनंद घ्या.

या सेवेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला Google Play Store वरून एक अॅप डाउनलोड करावं लागणार आहे. https://play.google.com/store/apps/details?id=com.streaming.bsnllivetv या लिंकवर क्लिक करून तुम्ही अॅप डाउनलोड करू शकता. अॅप डाउनलोड झाल्यानंतर 9424700333 या मोबाईल नंबरवर एक मिस्ड कॉल करा. तुमचा नंबर नोंद झाल्यानंतर तुमच्या स्मार्ट टीव्हीवर BSNL Live TV अॅप इन्स्टॉल होईल.

या चाचणीच्या टप्प्यात तुम्हाला कोणतेही अतिरिक्त डाटा शुल्क लागणार नाही किंवा तुमच्या अस्तित्वात असलेल्या FTTH प्लॅनमधूनही कोणताही डाटा कट होणार नाही

यापूर्वी BSNL ने फायबर ऑप्टिक्सच्या माध्यमातून 130 रुपये प्रति महिना इतक्या किमतीमध्ये त्यांची इंटरनेट प्रोटोकॉल टेलीव्हिजन (IPTV) सेवा सुरु केली होती. ही सेवा आताही उपलब्ध आहे आणि ती देखील खूपच किफायतशीर आहे. परंतु, ज्यांच्याकडे स्मार्ट टीव्ही आहे त्यांच्यासाठी हा नवीन पर्याय अधिक सोयीस्कर ठरू शकतो.

ही चाचणी सध्या मध्य प्रदेश मध्ये सुरू आहे. लवकरच संपूर्ण भारतभर सुरू होईल. त्यामुळे आता लवकरच BSNL अॅप डाउनलोड करून मोफत लाईव्ह टीव्हीचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स