ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
मसुरेत पावणाई देवी महिला दूध उत्पादक कृषी सहकारी संस्थेतर्फे सभासदांना गृहपयोगी वस्तू भेट.

मसुरेत पावणाई देवी महिला दूध उत्पादक कृषी सहकारी संस्थेतर्फे सभासदांना गृहपयोगी वस्तू भेट.

प्रकाशन: 10 Sep 2024 06:48 PM
वाचन संख्या 129

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे येथील पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक कृषी सहकारी संस्था मसुरे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी निमित्त पाच लिटर गोडेतेल भेट म्हणून देण्यात आले. गेली पाच वर्षे सदर संस्था शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या विविध भेटवस्तू उत्सवाच्या दरम्यान तसेच दिवाळीमध्ये दिवाळी बोनस वितरित करत आहे. यावेळी सुमारे ८० शेतकऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सौ अलका विश्वास साठे, उपाध्यक्ष सौ पूजा पांडुरंग ठाकूर, सचिव सौ तन्वी हिंदळेकर तसेच रमेश पाताडे, सचिन गोलतकर, सिद्धेश मसूरकर, सुरेश मापारी, तुळशीदास चव्हाण, हेमंत बागवे, धनाजी बागवे, भारती सावंत, सोयल फकी, महंमद खान, किरण पवार, मुबारक मीर, गणेश परब , विकास ठाकूर, सुरज परब, सुमित सावंत, संतोष राणे, आबा अहिर, सतीश बांदिवडेकर, संदेश पवार, कृष्णा चव्हाण, श्री पाताडे तसेच पावणाई देवी महिला दूध उत्पादक संस्थेचे सर्व सभासद लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी बोलताना या संस्थेचे मार्गदर्शक डॉक्टर विश्वास साठे म्हणालेत महिलांची ही दुग्ध संस्था येथील सभासदांच्या मागे नेहमी खंबीरपणे उभी असून दूध उत्पादनातून एक मोठी क्रांती घडविली आहे. उत्सवाच्या दरम्यान या सर्व सभासदांना भेटवस्तू वितरित करण्याचा या संस्थेचा अनोखा उपक्रम नेहमीच कौतुकास्पद आहे. सिद्धेश मसुरकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स