ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
'सोशल मिडिया दोडामार्ग पत्रकार संघटना' यांच्या डिजिटल आरती संग्रहाचे विशाल परब यांच्या उपस्थितीत प्रकाशन.

'सोशल मिडिया दोडामार्ग पत्रकार संघटना' यांच्या डिजिटल आरती संग्रहाचे विशाल परब यांच्या उपस्थितीत प्रकाशन.

प्रकाशन: 08 Sep 2024 11:12 AM
वाचन संख्या 150

दोडामार्ग | ब्युरो न्यूज : ‘सोशल मिडिया दोडामार्ग पत्रकार संघटना’ यांच्या डिजिटल आरती संग्रहाचे भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले. सोशल मीडिया दोडामार्ग पञकार संघटना तर्फे डिजिटल आरती संग्रह बनवण्यात आला. प्रकाशन प्रसंगी सिंधुदुर्ग न्यूज संपादक भूषण सावंत, युवा कोकण संपादक प्रथमेश गवस, कोकण लाईव्ह ब्रेकिंग उपसंपादक प्रतिक राणे, गाववार्ता संपादक आपा राणे उपस्थित होते.

डिजिटल सोशल मिडिया मध्ये दोडामार्ग पत्रकारांचे कार्य सर्वोत्तम असून समाजालील तळा गावातील समस्यांना वाचा फोडत न्याय दिला जात आहे. यापुढील विविध उपक्रमांना आपल्या शुभेच्छा असल्याचे प्रतिपादन यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी केले.

सोशल मीडिया दोडामार्ग व्हाट्सअप्प, युट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, वेब या माध्यमातून तसेच सोशल मीडिया अन्य प्लॅटफॉर्म माध्यमातून वाचक, दर्शक यांच्याशी जोडला आहे. अनेक लाईव्ह कार्यक्रम सोशल मीडिया माध्यमातून सातत्याने सुरु आहेत. कोकणचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सव निमित्ताने एक दर्जेदार आरती संग्रह वाचकांपर्यत पोहचवण्याचा प्रयत्न सोशल मीडिया दोडामार्ग च्या माध्यमातून करण्यात आला आहे. विविध आरती, अभंग व श्लोक विषयक माहिती, यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यावसायिक, उद्योजक, नेतेमंडळी यांच्या शुभेच्छा असा हा आरती संग्रह मोफत स्वरूपात सर्वत्र वितरित केला जात आहे. या आरती संग्रहाच्या दर्जाची सर्व स्तरावर प्रशंसा होत आहे.

फोटो सौजन्य | दोडामार्ग ब्यूरो

.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स