ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ  देवगड डॉक्टरांचा  कडकडीत बंद
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कोलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ देवगड डॉक्टरांचा कडकडीत बंद

प्रकाशन: 18 Aug 2024 09:32 AM
वाचन संख्या 122

आरोपींवर कडक कारवाई करा- डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब देवगड तालुका अध्यक्ष डॉ. सतीश लिंगायत व तालुका सेक्रेटरी डॉक्टर स्वप्नील शिंगाडे यांची मागणी मागणी.

नवलराज काळे |

शनिवार दिनांक 17 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2024 रोजी देवगड डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब तर्फे सर्व वैद्यकीय व्यावसायिक दवाखाने व इस्पितळे बंद ठेवून कोलकाता येथे झालेल्या स्त्री डॉक्टरच्या बलात्कार व खून प्रकरणी निषेध दर्शवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदला 100% पाठिंबा दिला. देवगड तालुक्यात सहित संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या बंदला पाठिंबा देण्यात आला.

दिनांक 9 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2024 रोजी कोलकत्ता येथील टू जी कार हॉस्पिटल मध्ये 36 तासांची ड्युटी करून थोडीशी विश्रांती घेण्यासाठी गेलेल्या मेडिसिन विभागाच्या विद्यार्थिनी असलेल्या महिला डॉक्टरचा अत्यंत घृणास्पद तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे वैद्यकीय व्यवसायिकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे याचा तीव्र निषेध दर्शवण्यासाठी देशातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व डॉक्टर्स यांनी शनिवार दिनांक 17 ऑगस्ट http://localhost/news/public/uploads/2024 रोजी कडकडीत बंद पुकारला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब या डॉक्टर संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाताडे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत देवगड तालुक्यातील सर्व डॉक्टर याने आपली वैयक्तिक दवाखाने बंद ठेवून कोलकत्ता येथील घडलेल्या घटनेच्या जाहीर निषेध केला आहे.डॉक्टर फ्रॅटर्निटी क्लब देवगड तालुका अध्यक्ष डॉ. सतीश लिंगायत व तालुका सेक्रेटरी डॉक्टर स्वप्नील शिंगाडे यांनी स्त्री डॉक्टर वरती झालेल्या बलात्कार व खून प्रकरणातील आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमताच सर्व डॉक्टर्स संपावर गेल्याचे निदर्शनास आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स