ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मनू भाकर-सरबज्योत जोडीची कांस्य पदकाची कमाई
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मनू भाकर-सरबज्योत जोडीची कांस्य पदकाची कमाई

प्रकाशन: 30 Jul 2024 05:41 PM
वाचन संख्या 62

Paris Olympics http://localhost/news/public/uploads/2024: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics http://localhost/news/public/uploads/2024) मनू भाकर (Manu Bhaker) आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने इतिहास रचला आहे.

10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकलं आहे. तसेच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी मनू भाकर पहिली आणि एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने दुसरे पदक जिंकले आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी दक्षिण कोरियाच्या ली वोंहो आणि ओ ये जिन या जोडीचा 16-10 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे पदक मिळाले आहे. मनू भाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे.

कोण आहे मनू भाकर?

22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. http://localhost/news/public/uploads/2022 साली मनू भाकरला एशियाडचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स