ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कार्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे... सेवा जनतेची...
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कार्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे... सेवा जनतेची...

प्रकाशन: 30 Jul 2024 02:34 PM
वाचन संख्या 97

कार्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे… सेवा जनतेची….डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवण शहरात औषध फवारणी

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहारात डासांचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला असून हत्तीरोग रुग्ण सापडून आले आहेत. डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन स्तरावर योग्य उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यतत्पर आमदार वैभव नाईक यांच्या वतीने मालवण शहारात डासप्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत आहे. मंगळवारी सकाळी मालवण फोवकांडा पिंपळ येथे जेष्ठ पदाधिकारी भाई कासवकर यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून या औषधं फवारणी मोहिमेची सुरवात करण्यात आली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख बाबी जोगी, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, भाई कासवकर, मनोज मोंडकर, बंड्या सरमळकर, उमेश मांजरेकर, सुहास वालावलकर, पॉली गिरकर, यशवंत चिंदरकर, साईनाथ वाघ, निनीश चव्हाण, राजेश वाघ, राजा इब्रामपूरकर, नाईक साटम , शिल्पा खोत, दीपा शिंदे, नांदा सारंग, अन्य उपस्थित होते.

नगरपरिषद प्रशासन योग्य उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचा आरोप करत मंदार केणी म्हणाले प्रशासन योग्य उपाययोजना करण्यात कमी पडत असले तरी आमदार वैभव नाईक जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहेत. दोन दिवसांपूर्वी मालवण शहरातील आरोग्य यत्रणा व उपाययोजना यांचा आढावा घेण्यात आला. आता मालवण शहरात सर्वत्र औषधं फवारणी व अन्य उपाययोजना करण्यात येणार असल्याचे केणी म्हणाले.

नगरपरिषद स्तरावरून होणाऱ्या उपाययोजना बाबत नागरिक नाराज आहेत. त्यामुळे त्यांच्या मागणी नुसार आमदार वैभव नाईक यांनी ही डास फवारणी मोहीम सूरू केल्याचे यतीन खोत यांनी सांगितले. यापूर्वीही कोरोना काळ, वादळ असो अथवा कोणतीही आपत्ती आमदार वैभव नाईक जनतेच्या मदतीसाठी सेवेसाठी नेहमीच तत्पर राहिले आहेत. आताही जनतेची सेवा याचं उद्देशाने कार्य सूरू असल्याचे खोत म्हणाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स