वालावल येथील श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरीटेबल ट्रस्ट व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या सेवाभावी संस्थांतर्फे गरजूंना साहित्य वाटप.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या वादळात दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावातील पूरग्रस्थ बाधितांना श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट वालावल व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई या संस्थांतर्फे आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी,संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी व जि.प. सदस्या श्रीम. देसाई, संस्था सचिव संदीप साळसकर, आरती गवंडी,यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
त्याचप्रमाणे कुडाळ तालुक्यातील आंबेरी,वाडोस, पुळास, या गावांमध्येही, बबन बोभाटे, रामभाऊ धुरी,प्रशांत म्हाडगुत,दिलीप म्हाडगुत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)