ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीत भरणार  'दिवाळी बाजार' :नगराध्यक्ष समीर नलावडे..

कणकवलीत भरणार 'दिवाळी बाजार' :नगराध्यक्ष समीर नलावडे..

प्रकाशन: 20 Oct 2021 12:37 PM
वाचन संख्या 37

कुंभार समाज हस्त कलेतून तयार केलेली मातीची भांडी असणार उपलब्ध; बचतगटांनी तयार केलेला फराळाची होणार विक्री..

स्थानिक कला आणि रोजगाराला चालना देणारा एक अनोखा व्यावसायिक उपक्रम…!

कणकवली | उमेश परब : दिवाळी सणानिमित्त कणकवली नगरपंचायत व युथ वेल फेअर असोशिएशन यांच्यावतीने २८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी बाझार कुंभार समाजाने बनवलेली मातीची भांडी व विविध हस्त कलेतून तयार केलेली साधने प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे.बचत गटांच्या माध्यमातून तयार केलेला सर्व प्रकारचा फराळ विक्री साठी उपलब्ध असणार आहे,या सर्वांना लाईट व टेबल व्यवस्था नगरपंचायतच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर,मेघा गांगण,अण्णा कोदे, विराज भोसले,बांधकाम सभापती अभिजित मुसळे, अजय गांगण,किशोर राणे,संस्थेचे विवेक ताम्हणकर,सचिव रुपेश घाडी, मनीष सागवेकर,सहसचिव रौफ काझी आदी उपस्थित होते.

कुंभार समाजाचे १५ स्टाॅल्स लागणार आहेत.हा बाजार पेट्रोल पंपाच्या समोरील उड्डाण पुलाच्या खाली असणार आहे.शहरातील नागरिकांना फराळ व आकाश कंदील उपलब्धता होईल.मातीच्या पणत्या देखील त्याच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.मातीचे कंदील देखील असणार आहेत.२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत हा दिवाळी बाजार असणार आहे.कणकवली शहरातील बचतगटांचे नियोजन मेघा गागण यांच्याकडे असेल.टेस्ट करुन फराळ ऑर्डर द्यावेत.कणकवली शहरातील नागरिकांना आगळंवेगळं आयोजन असेल.२८ ऑक्टोबरला रात्री ५.३० वाजता उद्घाटन असेल,असे समीर नलावडे यांनी सांगितले.

कुंभार समाजाला व्यासपीठ देण्यासाठी हा प्रयत्न आहे.कुंभार समाज लाईव्ह माती कामाचा प्रात्यक्षिक दाखवलं जाणार आहे.तसेच दर दोन महिण्याने याबाबत पुन्हा प्रदर्शन ठेवले जाणार आहे,असेही समीर नलावडे यांनी जाहीर केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स