सिंधूदिनांक.
निवडक दिनविशेष : ( दिनांक : वीस ऑक्टोबर )
१९०४: चिली आणि बोलिव्हिया यांनी शांतता करारावर सह्या करून उभय देशांतील सीमा निश्चित केल्या.
१९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९५०: कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.
१९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.
१९६२: चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.
१९६९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.
१९७०: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.
१९७१: मंदीच्या तडाख्यामुळे नेपाळमधील रोखेबाजार कोसळला.
१९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
१९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
१९९५: ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.
२००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.
२०११: लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गद्दाफ़ी यांना पकडून ठार केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)