ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे टिकतात तेच पवारसाहेबांचे कट्टर कार्यकर्ते : श्री.नागेश्वर फाटे
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे टिकतात तेच पवारसाहेबांचे कट्टर कार्यकर्ते : श्री.नागेश्वर फाटे

प्रकाशन: 19 Oct 2021 07:44 PM
वाचन संख्या 37

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे


सावंतवाडी | ब्युरो न्यूज :
राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून, त्यांच्या उपस्थितीत आज सावंतवाडीत उद्योग व व्यापार विभाग सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक जण पक्ष सोडून गेले, परंतु जे गेले ते कधीच आपले नव्हते, जे आहेत ते खरे आणि पवार साहेबांचे कट्टर कार्यकर्ते आहेत. सभागृहातील गर्दी कमी दिसत असली तरी ती गर्दी प्रामाणिक असल्याने ही गर्दी देखील कमी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते म्हणाले की, पुंडलिक दळवी यांचे जिल्ह्यातील काम उत्कृष्ट असल्याने वेळ न घालवता आणि इतर कोणत्याही प्रकारची चौकशी न करता पुन्हा एकदा त्यांची उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी चांगले प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षाकडून आणखी बळ देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच पूर परिस्थितीत, कोरोना काळात झालेले नुकसान याची योग्य भरपाई त्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, उद्योग व व्यापार सेल जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काका कुडाळकर, भास्कर परब, शिवदत्त घोगळे, श्री. सराफदार, शफिक खान, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, कार्याध्यक्ष हिदायतुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष दर्शना बाबर-देसाई, रिया भांबुरे, सावली पाटकर, जहिरा ख्वाजा, अशोक पवार, बावतीस फर्नांडिस, शैलेश लाड, असलम खतिब, राजू धारपवार, इफ्तिकार राजगुरू, नवीन गांवकर, नवल साटेलकर, आसिफ ख्वाजा, याकुब शेख, नियाज शेख, सिद्धेश तेंडोलकर आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स