ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अवैध दारुसोबतच साडे नऊ लाखांचा एकूण मुद्देमाल जप्त...!

अवैध दारुसोबतच साडे नऊ लाखांचा एकूण मुद्देमाल जप्त...!

प्रकाशन: 19 Oct 2021 10:05 PM
वाचन संख्या 162

उत्पादन शुल्क कोल्हापूर येथील भरारी पथकाची धडक कारवाई

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेजारच्या गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामार्गेच बेकायदेशीर पद्धतीने केल्या जाणाऱ्या दारू वाहतुकी विरोधात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाया केल्या. पहिल्या कारवाईत गोवा बनावटीचा दारू साठा घेऊन जात असलेल्या स्विफ्ट कारवर (एमएच ०४ डीएन ७८५४) धडक कारवाई करत एकूण ६ लाख ४४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी कोंडुरा गावाच्या हद्दीत कोंडुरे ते निरवडे या मार्गावर करण्यात आली.
या कारवाईत गोवा बनावटीच्या विविध कंपनीच्या दारूचे एकूण ५० बॉक्स जप्त करण्यात आले असून गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर (रा. वेंगुर्ला) याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चिंचवड येथे गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत चारचाकी (एमएच ०१ व्हीए ५७४५) मधून केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या विविध प्रकारच्या दारुचे ३ लाख ८ हजार ७६० असे एकूण १५ बॉक्स तसेच वापरण्यात आलेले चारचाकी असे एकूण ९ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सुजय कन्हेया छेडा (गांधीनगर, कोल्हापूर) आणि शंकर विष्णुमल वाणी (कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
    सदरची कारवाई विभागीय उपआयुक्त यशवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. आर. पाटील, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, के. डी. कोळी, जवान सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार व दिपक कापसे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे व निरीक्षक पी. आर. पाटील करीत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स