उपक्रमशील शिक्षक श्री. हृदयनाथ गावडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार जाहीर.
मसुरे | प्रतिनिधी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेंडोली आवेरे, ता. कुडाळ येथील उपक्रमशील शिक्षक श्री. हृदयनाथ गावडे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम. एस.पी) चा राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक) पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्री. दिपक डवर ,श्री. शिवराज सावंत, सौ.संपदा बागी, श्री. शितल देवरकर या जिल्हा निवड समिती प्रमुखांद्वारे त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पॅनल टीमच्या वतीने सिंधुदुर्ग निवड समिती प्रमुख श्री. शिवराज सावंत यांच्या हस्ते श्री. हृदयनाथ गावडे यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान (आदर्श शिक्षक ) पुरस्कार निवड पत्र व शाल देऊन गौरवण्यात आले. श्री.हृदयनाथ गावडे हे उच्च विद्या विभूषित असून कीर्तन विशारद, गांधर्व महाविद्यालयाची गायन मध्यमा, पत्रद्वारा दासबोध अध्ययन समीक्षक या परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
मसुरे नं. १ शाळेत कार्यरत असतेवेळी तब्बल ४० प्रयोग केलेला मुलींच्या दशावताराला श्री. हृदयनाथ गावडे यांची संगीत साथ लाभली होती. विद्यार्थी विकासासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून त्याद्वारे विद्यार्थी प्रगती करण्यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्या श्री.हृदयनाथ गावडे सर यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा, गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक येथे १४ मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)