ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आडवली समर्थ गड येथे १० एप्रिल पासून स्वामी समर्थ जयंती उत्सवाचे आयोजन.

आडवली समर्थ गड येथे १० एप्रिल पासून स्वामी समर्थ जयंती उत्सवाचे आयोजन.

प्रकाशन: 29 Mar 2024 04:58 PM
वाचन संख्या 349

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थगड – आडवली येथे १० एप्रिल २०२४ रोजी श्री स्वामी जयंती उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.  यानिमित्त १० एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

१० एप्रिल रोजी सकाळी ६ ते ९  विधीवत पूजा, सकाळी ९.०० वा. नंतर भाविक भक्तांना दर्शन, दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी २ ते सायं. ७.३० पर्यंत हळदीकुंकू समारंभ, रात्री ८.०० ते ८.३०. महाआरती, ९.०० ते १२.०० महाप्रसाद ९.०० वा. पासून सुस्वर स्थानिक भजने. ११ आणि १२ एप्रिल रोजी रात्री ९.०० वा. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील स्पर्धकांची एकेरी नृत्य स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु. ९०००/- सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु.७०००/- सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रु.५०००/- सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ बक्षीस असे ठेवण्यात आले आहे.
१३ आणि १४ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील स्पर्धकांची समूह नृत्य स्पर्धा . प्रथम पारितोषिक रु. १५,०००/- सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु.१२,०००/- सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रु.९,०००/- सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ बक्षीस. रात्री ९.०० वा. अल्पोपहार व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

१५ एप्रिलला रात्री ९ वा. भजन अलंकार बुवा अजित गोसावी, बुवा भालचंद्र केळुसकर, बुवा कृष्णा राऊळ यांचा संगीत जुगलबंदी कार्यक्रम. १६ एप्रिल रोजी रात्री ९ वा. २०-२० तिरंगी भजनबारी सामना, बुवा विनोद चव्हाण, बुवा संदीप पुजारे, बुवा अरुण घाडी या भजनी बुवांमध्ये होणार आहे. या सामन्यात प्रेक्षकांना मधून प्रश्नोत्तरे करण्यात येणार आहेत. परिक्षण बुवा भालचंद्र केळुसकर करणार आहेत. १७ एप्रिल रोजी रात्री ९ वा. एकेरी नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धेतील प्रथम पाच स्पर्धकांचा महा मुकाबला स्पर्धा होणार आहे. स्पर्धेनंतर लगेच बक्षीस समारंभ होणार आहे. १८ एप्रिल रोजी सांगता सोहळा सकाळी विधिवत पूजा, रात्री ८ ते ८.३० महा आरती, रात्री ९ वा. महाप्रसाद, रात्री ९.०० वा. सेवेकरी पालकांच्या मुलांचे व दशक्रोशीतील मुलांसाठी एकेरी नृत्य स्पर्धा होणार आहे.यावेळी भव्य दिव्य जत्रोत्सव पाळणी, खेळणी, कपडयांची दुकाने इत्यादी असणार आहेत.

अधिक महिती साठी डॉ. सिद्धेश सकपाळ ( ९४२०८९०८१०), प्रकाश गवस (९४०३३५०८४९), सिताराम नागेश सकपाळ (९४२०२१०२६२), अतुल घाडीगांवकर ( ९५७९०५८९०३), समीर घाडी(९३५९५०८१२१), गणेश घाडी(९२८४६२०५३२), तावडे ( ९३५६७४६३६४) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ चरणसेवक भाई महाराज यांनी केले आहे. सर्व कार्यक्रमांना उपस्थीतीचे आवाहन समर्थ गड आडवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स