ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गवा रेड्याच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्याची वनविभागाने घेतली तातडीने दखल ; घटनास्थळी जाऊन केला पंचनामा.

गवा रेड्याच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्याची वनविभागाने घेतली तातडीने दखल ; घटनास्थळी जाऊन केला पंचनामा.

प्रकाशन: 29 Mar 2024 06:14 PM
वाचन संख्या 552

जबर जखमी बाबल्या पवार यांच्या आर्थिक मदतीसाठी प्रयत्नशील असल्याची अधिकार्यांची माहिती .

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगांव – साळशी मार्गावरील चौकेवाडी फाट्या नजीकच्या वळणावर काल गुरुवारी रात्री साडेआठ च्या सुमारास एका दुचाकीस्वाराला एका गवा रेड्याने अचानक हल्ला केल्याने ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना पुढील अधिक उपचारासाठी कणकवलीतील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. याची दखल संबधित वनविभागाने तत्काळ घेऊन घटनास्थळी जाऊन आज २९ मार्चला संध्याकाळी ४ वाजता रीतसर पंचनामा केला.

जखमी श्री बाबल्या पवार.

काल गुरुवारी साळशी येथील बाबल्या गणपत पवार हे आपल्या मोटारसायकल ने कामानिमित्त शिरगांव ला गेले होते. ते संध्याकाळी घरी साळशी येथे जात असताना रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास एका गवा रेड्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात ते गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना अधिक उपचाराकरिता कणकवली येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांना सुरवातीला शिरगांव येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले होते. त्यांच्या शरीराची उजवी बाजू खूपच कमकुवत झाल्याने त्यांना नीट बोलताही येत नाही. डोक्याला पण मार लागला आहे. बाबल्या पवार यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट आहे.ते मोलमजुरी करून आपला कुटुंब सांभाळीत आहेत. त्यांना यावेळी आर्थिक मदतीची खरी गरज आहे. अशी मागणी होत आहे.

पंचनामा करतेवेळी देवगड वनधिकारी सारीक फकीर, वनरक्षक रामदास घुगे, वनक्षेत्रपाल कणकवली चे राजेंद्र घुणकीकर, सामाजिक वनीकरण च्या वनपाल आशा शिंदे, शिरगांव पोलीस पाटील चंद्रशेखर साटम, सत्यवान पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना वनधिकारी सारीक फकीर यांनी जखमी बाबल्या पवार यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स