ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हुमरमळा (वालावल) गांवात आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ८८ लाखांच्या कामांची भूमिपूजने संपन्न.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हुमरमळा (वालावल) गांवात आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते ८८ लाखांच्या कामांची भूमिपूजने संपन्न.

प्रकाशन: 24 Feb 2024 07:44 PM
वाचन संख्या 60

खासदार विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मंजूर झालेली विकासकामे.

कुडाळ | देवेंद्र गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरमळा (वालावल) गांवात खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून तब्बल ८८ लाखांच्या कामांची भूमिपूजने आज आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यामध्ये हुमरमळा येथील रामेश्वर विद्यामंदिर जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी २० लाख, हुमरमळा ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी १६ लाख, हुमरमळा (वालावल) देसाईवाडी पुलासाठी २५ लाख, हुमरमळा बिजोळवाडी रस्त्यावरील पुलासाठी १९ लाख, हुमरमळा बिजोळवाडी रस्त्यासाठी ८ लाख रु मंजूर करण्यात आले आहेत. या कामांची भूमिपूजने पार पडली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोबाटे,कुडाळ गटविकास अधिकारी श्री. जगताप, विस्तार अधिकारी श्री.ओरोसकर, माजी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अतुल बंगे, सरपंच अमृत देसाई, माजी सरपंच सौ. अर्चना बंगे, उपसरपंच सौ. रश्मी वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य मितेश वालावलकर, सौ. संजना गुंजकर, सौ. हेमांगी कद्रेकर, शाखाप्रमुख रमेश परब, युवासेना उपशाखा प्रमुख आशिष परब, नेरूर ग्रा.पं. सदस्य मंजुनाथ फडके व ग्रामस्थ प्रकाश पराब, प्रतीक्षा परब, सुषमा वालावलकर, रेणुका परब, सोनाली मांजरेकर, शरद वालावलकर, बाळा तावडे, रुपेश तुळसकर, योगेश कानडे, मयूर प्रभू, हेमंत कद्रेकर, अभय मयेकर, कांता माडये, प्रभाकर गुंजकर, स्नेहलदीप सामंत, अमित सावंत, शैलेश मयेकर, अमित बंगे, काश्या तुळसकर, बाबू तावडे, प्रसाद कानडे, श्रीपाद कानडे, गणेश कानडे, उमेश कानडे, जितू सावंत, संतोष जाधव, आशु देसाई आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स