सांगुळवाडी नं. १ शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; 'मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा' राज्यस्तरीय स्पर्धेत वैभववाडी तालुक्यात शाळेचा प्रथम क्रमांक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय..!
मुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार शाळेला ८ लाखांचे पारितोषिक…!
वैभववाडी | प्रतिनिधी: भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगुळवाडी नं. १ या शाळेने वैभववाडी तालुक्यात प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्हयात दुसरा क्रमांक मिळविला आहे . शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. समीर रावराणे, सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, हितचिंतक, मुख्याध्यापक सौ. स्नेहलता राणे (महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका), श्री. महादेव शेट्ये, श्री समीर सरवणकर व सर्व विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमातून शाळेने हे यश संपादन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाळेचा गौरव होणार आहे.. शाळेच्या या यशाबद्दल .गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी , मा . केंद्रप्रमुख , पालक – ग्रामस्थ , यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे . स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शाळेने आभार मानले आहेत. .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)