दत्ता बांदेकर इज 'बॅक टू गाॅडस् ईडन पॅव्हेलीयन' ; आजीवन क्रिकेटला वाहिलेले मालवणचे श्री दत्ताराम शंभू बांदेकर कालवश.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे क्रिकेटींग पितामह श्री दत्ताराम शंभू बांदेकर उर्फ दत्ता बांदेकर यांचे काल १५ फेब्रुवारीला सकाळी मुंबई येथे निधन झाले. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन धाकट्या बहिणी तसेच धाकटे बंधू व मालवण एस टी आगारचे निवृत्त चालक श्री गजानन बांदेकर, भावजय, पुतणी, ,२ भाच्या असा परीवार आहे.
दिवंगत दत्ता बांदेकर यांचे कुटुंब मूळ वेंगुर्ले येथील होते. त्यांचा जन्म मालवण शहरात झाला होता. शहरातल्या टोपीवाला हायस्कूल व ज्युनियर काॅलेज येथे शिक्षण घेतलेल्या दत्ताराम बांदेकर यांनी त्यांचे संपूर्ण जीवन क्रिकेट खेळासाठी समर्पित केले होते. मालवण शहरातील सर्व ज्येष्ठ क्रिकेटपटू हे दिवंगत दत्ता बांदेकर यांचा परीवाराचाच सदस्य होता. भांड्यांचे ज्येष्ठ व्यापारी अशोक कडू, ज्येष्ठ क्रिकेटपटू भाऊ हडकर, कै. लीलाधर हडकर यांचे ते समकालीन तर महेश कांदळगांवकर, विक्रम मोरे पप्पू परब, नंदू देसाई, जयंत गवंडे, जगदीश नेवाळकर, उत्तम नेमळेकर, उमेश मांजरेकर वगैरे अनेक ज्येष्ठ क्रिकेटर यांचे ते निकटवर्तीय होते
दत्ता बांदेकर हे त्यांच्या जीवनाची क्रिकेटसाठी समर्पित केलेली उल्लेखनीय खेळी करुन देवाच्या पॅवेलीयनमध्ये परतले अशीच प्रतिक्रिया त्यांच्या निधनानंतर मालवणच्या क्रिकेट वर्तुळातील ज्येष्ठांकडून व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)