ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
लुडबेवाड्यातील तुळजाभवानी मंदिर सभामंडप लोकार्पण सोहळा संपन्न ; खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर तसेच मंदिर कमिटी पदाधिकारी,  लुडबे ऐक्यवर्धक मंडळ पदाधिकारी यांची उपस्थिती.

लुडबेवाड्यातील तुळजाभवानी मंदिर सभामंडप लोकार्पण सोहळा संपन्न ; खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर तसेच मंदिर कमिटी पदाधिकारी, लुडबे ऐक्यवर्धक मंडळ पदाधिकारी यांची उपस्थिती.

प्रकाशन: 16 Feb 2024 09:31 PM
वाचन संख्या 665

आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून २० लाखाचा निधी मंजूर केलेले काम ; मंदिर कमिटी व लुडबे ऐक्यवर्धक मंडळाने मानले आमदार वैभव नाईक आभार.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते व आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या उपस्थितीत मालवण शहरातल्या वायरी लुडबेवाडा येथील श्री तुळजाभवानी मंदिर सभामंडप लोकार्पण सोहळा आज १६ फेब्रुवारीला सायंकाळी संपन्न झाला. आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपये या सभामंडपासाठी मंजूर करुन दिले या बद्दल मंदिर कमिटी, स्थानिक शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक, महिला आघाडी, युवतीसेना तसेच लुडबे ऐक्यवर्धक मंडळाकडून आमदार वैभव नाईक यांचे विशेष आभार मानत मधुकर लुडबे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. खासदार विनायक राऊत यांचा प्रदीप लुडबे यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचाही सदिच्छा सत्कार करण्यात आला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तालुका प्रमुख हरी खोबरेकर , वायरी सरपंच भगवान लुडबे, शिवसेना शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, माजी नगरसेविका सौ. सेजल सन्मेष परब, माजी नगरसेवक मंदार केणी, सौ. दीपा शिंदे, सौ. पूनम चव्हाण, सौ. श्वेता सावंत, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर उमेश मांजरेकर, संतोष लुडबे, संजय लुडबे, भाई लुडबे, पप्पू लुडबे, आप्पा चव्हाण, मनोज लुडबे तसेच तुळजाभवानी मंदिर कमिटीचे पदाधिकारी व सभासद, स्थानिक व मुंबईस्थित सदस्य, तसेच वायरी आणि लुडबेवाडा ग्रामस्थ, लुडबे ऐक्यवर्धक मंडळाचे सर्व पदाधिकारी व सभासद यावेळीउपस्थित होते. लुडबेवाडा येथील शिवसेना पदाधिकारी, माजी नगरसेवक व शिवसैनिक यांचाही यावेळी सदिच्छा सन्मान करण्यात आला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 301

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स