ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
भाजप महिला आघाडी व ओसरगांव जिजाऊ महिला संस्था अध्यक्ष सौ.  नीलमताई राणे पुरस्कृत हळदी कुंकू समारंभांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

भाजप महिला आघाडी व ओसरगांव जिजाऊ महिला संस्था अध्यक्ष सौ. नीलमताई राणे पुरस्कृत हळदी कुंकू समारंभांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 17 Feb 2024 01:10 PM
वाचन संख्या 218

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका भाजप महिला आघाडी व ओसरगांव जिजाऊ महिला संस्था अध्यक्ष सौ. नीलमताई राणे पुरस्कृत हळदी कुंकू समारंभांना मालवण तालुका व शहर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मालवण तालुक्यातल्या वेरली, महान, वडाचा पाट, चिंदर, गोळवण गावात या उपक्रमांसाठी महिला आघाडी कार्यकर्त्या व पदाधिकारी यांची या समारंभांसाठी सक्रीय उपस्थिती होती. मालवण शहर भाजप कार्यालय येथे संपन्न झालेल्या समारंभाला तालुका अध्यक्ष सौ. पूजा करलकर, ओबीसी सेल अध्यक्ष पूजा वेरलकर, उपतालुका अध्यक्ष सौ. राणी पराडकर, मालवण शहर अध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर, भाजपा चित्रपट कामगार सेना जिल्हाध्यक्ष सौ. नमिता गांवकर, महिला जिल्हा चिटणीस सौ. पूजा सरकारे, महिला शहराध्यक्ष सौ. दीव्या कोचरैकर, शहर महिला उपाध्यक्ष सौ. वैष्णवी मोंडकर, भाजपा महिला संघटक सौ. स्मिता प्रभाळे, माजी नगरसेविका सौ. महानंदा खानोलकर, शहर सरचिटणीस सौ. महिमा मयेकर, सौ. तनुजा हरी चव्हाण तसेच भाजपा महिला कार्यकर्त्या यांची सक्रीय उपस्थिती होती. वडाचा पाट येथील अंत्योदय कार्ड धारकांना साडी वाटप करण्यात आले. गोळवण व चिंदर येथे महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. या दरम्यान या कार्यक्रमांना महिला जिल्हा समन्वयक सौ. दीपलक्ष्मी पडते आणि कुडाळ महिला तालुकाध्यक्ष सौ. सुप्रीया वालावलकर यांची विशेष उपस्थिती होती.

वडाचा पाट सरपंच सौ. प्रभूदेसाई, बिळवस सरपंच सौ. मानसी पालव, चिंदर सरपंच सौ. पारकर, मालवण तालुकाध्यक्ष श्री धोंडी चिंदरकर, वडाचा पाट उपसरपंच , खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, महान येथून महिला कार्यकर्त्या हीमानी शिंदे व संजना बिरमोळे तसेच अभी गावडे मित्रमंडळ व गोळवण ग्रा. पं सदस्य विरेश पवार यांनी सर्व कार्यक्रमाना संयोजन सहकार्य केले.

भाजपा महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ. पूजा करलकर आणि मालवण शहर अध्यक्ष सौ. अन्वेषा आचरेकर यांनी ओसरगांव जिजाऊ महिला संस्था अध्यक्ष सौ नीलमताई राणे तसेच उपस्थित सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि उपस्थित महिलांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 16
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 323

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स