ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
लोकराजा सुधीर कलिंगण यांनी  दशावतार कला खर्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली आणि   राजकीय क्षेत्रामधून या कलेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत : आमदार वैभव नाईक
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

लोकराजा सुधीर कलिंगण यांनी दशावतार कला खर्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवली आणि राजकीय क्षेत्रामधून या कलेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत : आमदार वैभव नाईक

प्रकाशन: 08 Feb 2024 05:46 PM
वाचन संख्या 110

लोकराजा कै. सुधीर कलिंगण द्वितीय स्मृतिदिनी नेरूर येथे आयोजीत कार्यक्रम.

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : दशावतार ही लोककला देशातच नाही तर जगात पोहोचली आहे. ही कला खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार नेण्याचे काम लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांनी केले. त्यामुळेच जनतेने त्यांना दशावतारातील लोकराजा हि पदवी दिली. सुधीर कलिंगण यांच्या पश्चात कलिंगण कुटुंबियांनी त्याच ताकदीने दशावतारी कलेचा वारसा पुढे नेण्याचे काम केले. रसिक प्रेक्षकांनी देखील कलिंगण कुटुंबियांना भरभरून प्रतिसाद दिला. या कलेला राजकीय क्षेत्रामधून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचा द्वितीय स्मृतिदिन काल नेरूर येथे साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून कै. सुधीर कलिंगण यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे, सरपंच भक्ती घाडीगावकर, काका कलिंगण, राजू कलिंगण, बाळा कलिंगण,आबा कलिंगण,भास्कर सामंत, मंजुनाथ फडके, दत्ता देसाई, यशवंत काका तेंडुलकर, सिद्धेश कलिंगण,पंकज कलिंगण, ऍड सोनू गवस, संतोष रेडकर, बाळा सावंत,प्रेमानंद देसाई, ऍड. पी. डी. देसाई, प्रा. प्रणाली मयेकर, दया धाऊसकर, चंद्रकांत खोत, बाबली आकेरकर,श्री. आजगावकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स