ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कै. श्रीमती नीता नीळकंठ दीक्षित स्मृती प्रित्यर्थ श्री निरंजन दीक्षित पुरस्कृत श्रीराम गीत गायन स्पर्धा संपन्न ; देवगड तालुक्यातल्या वाडा येथे आयोजीत स्पर्धा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कै. श्रीमती नीता नीळकंठ दीक्षित स्मृती प्रित्यर्थ श्री निरंजन दीक्षित पुरस्कृत श्रीराम गीत गायन स्पर्धा संपन्न ; देवगड तालुक्यातल्या वाडा येथे आयोजीत स्पर्धा.

प्रकाशन: 08 Feb 2024 05:22 PM
वाचन संख्या 117

शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या वाडा येथे कै. श्रीमती नीता नीळकंठ दीक्षित स्मृतिप्रीत्यर्थ, श्री निरंजन नीळकंठ दीक्षित पुरस्कृत श्रीराम गीत गायन स्पर्धा श्री दत्त मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. बालगट, कुमार गट व खुला गट मिळून सुमारे मिळून एकूण ७० स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेची सुरुवात विनायक नेने व निरंजन दीक्षित यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी प्रियांका वेलणकर यांनी गुरु गीत सादर केले. उदय गोखले व विनोद गोखले हे या स्पर्धेचे परीक्षक होते. स्पर्धा आयोजन समितीमध्ये प्रियांका वेलणकर, हर्षद जोशी, विश्वास वेलणकर, संदीप फडके, मानसी करंदीकर, राधिका काणे आणि ओंकार गाडगीळ यांनी स्पर्धा आयोजनाचे काम पाहिले. संदीप फडके, प्रियांका वेलणकर व हर्षद जोशी यांनी हार्मोनियम तर सौरभ वेलणकर व अभिनव जोशी यांनी तबला साथ केली. स्पर्धेचे सूत्रसंचालन ओंकार गाडगीळ यांनी केले.

स्पर्धेच्या समारोपाच्या वेळी बुजुर्ग कीर्तनकार मधुकर गोगटे ,भजनी बुवा सखाराम पुजारे, पखवाज वादक प्रवीण पुजारे गायक प्रसाद शेवडे, गायिका राधा जोशी, सच्चा राम भक्त दामूकाका अभ्यंकर आणि चित्रकार अभिषेक मेस्त्री यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. समारोपाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर यश वेलणकर यांनी आपल्या खास शैलीमध्ये रामाचा आदर्श जीवनात कसा ठेवावा याबाबत मार्गदर्शन केले. पारितोषिक वितरण समारंभ सर्व सत्कारमूर्ती तसेच विनायक नेने आणि दीक्षित फाउंडेशनचे सर्वेसर्वा निरंजन दीक्षित यांच्या हस्ते संपन्न झाला.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे: बालगट- प्रथम क्रमांक – वेद चव्हाण, द्वितीय क्रमांक- आरोह पेंडुरकर, तृतीय क्रमांक- हिमांशू चव्हाण, उत्तेजनार्थ- शौनक वेलणकर.

कुमार गट- प्रथम क्रमांक- प्राजक्ता ठाकूरदेसाई,द्वितीय क्रमांक- संस्कृती जोशी ,तृतीय क्रमांक- हर्ष बोंडाळे,उत्तेजनार्थ- राज्ञी कुलकर्णी.

खुला गट- प्रथम क्रमांक- शौरीन देसाई , द्वितीय क्रमांक- निशा धुरी, तृतीय क्रमांक- हेमंत तेली. उत्तेजनार्थ- श्रेया देवधर.सदर स्पर्धेमध्ये सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख रक्कम असे बक्षिसाची स्वरुप होते. दीक्षित फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे सांगीतिक क्षेत्रामध्ये एक चांगला पायंडा पडला अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स