श्रावण येथील दक्षता चव्हाण कालवश ; पत्रकार गणेश चव्हाण यांची कन्या.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या श्रावण येथील दक्षता उर्फ राणी चव्हाण ( वय २२ वर्षे ) हिचे उपचार सुरु असताना अल्पशः आजाराने निधन झाले. श्रावण येथील पत्रकार प्रतिनिधी व नाभिक समाजाचे सक्रीय कार्यकर्ते श्री. गणेश चव्हाण यांची ती कन्या होत. काल शुक्रवारी दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिवंगत दक्षता ही अत्यंत सुस्वभावी, शैक्षणिक दृष्ट्या हुशार व मनमिळावू म्हणून ओळखली जात होती. तिच्या पश्चात आई, वडिल, आजी, काका, काकी, भाऊ, बहीण असा परिवार आहे.
दिवंगत अक्षता हिच्या निधनाने श्रावण, पळसंब गांव व परिसरातून, जिल्हा व तालुक्यातील नाभिक समाज बांधवांमधून आंणि पत्रकार बांधवांमधून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)