ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
गोळवणच्या विवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयीत पतीला अटक...!

गोळवणच्या विवाहीतेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयीत पतीला अटक...!

प्रकाशन: 14 Oct 2021 11:23 PM
वाचन संख्या 55

मयत विवाहितेच्या बहिणीने दिली तक्रार…..

पोईप | ओंकार चव्हाण : गोळवण येथील जयश्री बाळकृष्ण खरात या विवाहितेचा मृतदेह मंगळवारी दुपारी राहत्या घरात गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला होता. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. दरम्यान जयश्री हिच्या मोबाईलच्या कव्हरमध्ये एक चिठ्ठी पोलिसांना तपासादरम्यान सापडून आली. यात मुलबाळ होत नसल्याने पती शारीरिक व मानसिक छळ करतो त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा मजकूर नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरू होता. काल मयत जयश्री हिची बहीण सौ. संतोषी संतोष वरक रा. कडावल कुडाळ यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. जयश्री हिचा पती हा मयत जयश्री हिचा मानसिक व शारीरिक छळ करत होता. मुलबाळ होत नसल्याने परत लग्न करण्यासाठी एका महिलेशी संबंध असल्याचेही त्याने जयश्री हिला सांगितले होते. जयश्री हिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. अशी तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार तिच्या पतीविरोधात मालवण पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बाळकृष्ण खरात याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्याला अटक झाली आहे. याप्रकरणी मालवण पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर हे पुढील सखोल तपास करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स