ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मालवण शहरातील प्रभाग क्र ३ मधील लसीकरण झाले उत्साहात..!

मालवण शहरातील प्रभाग क्र ३ मधील लसीकरण झाले उत्साहात..!

प्रकाशन: 14 Oct 2021 11:00 PM
वाचन संख्या 65

नगरसेवक श्री यतिन खोत यांनी केला आरोग्य सेविकांचा सन्मान…

वैभव माणगांवकर | मालवण : मालवण शहरातील प्रभाग क्र. ३ येथील टोपीवाला हायस्कूल येथे मालवण आरोग्य विभाग्याच्या वतीने लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी कोरोना प्रतिबंधीत कोविडशिल्ड लसीचे पहिला आणि दुसरा डोस देण्यात आले. तेथे सुमारे ४४ नागरिकांनी लसीकरणाचे लाभ घेतला असून त्या वेळी मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी “दुर्गादेवीचे तुम्ही वेगळे रूपे आहात” असं म्हणत सेवा बजावणार्या आरोग्य सेविकांचा सहर्ष गौरव करुन नगरसेवक यतीन खोत यांनी त्यांना भेट वस्तू देऊन सन्मानित केले. या शिबिराच्या उपक्रमाच्यावेळी नगरसेवक यतीन खोत, मनोज शिरोडकर, गणेश चिंदरकर, होमगार्ड मधू मालवणकर, सुरेखा वरक, तसेच हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नगरपालिका कर्मचारी राजू कासले,पूजा भेग, आरोग्य विभागातुन मालवण ग्रामीण रुग्णालयमधील डॉ.बालाजी पाटील ,आरोग्यसेविका विद्या सावंत, समीक्षा खोत. मिलिंद चव्हाण, खोडके, कॊरडे. या सर्वांनी लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
नगरसेवक श्री. यतीन खोत यांनी प्रभागातील नागरिकांचे तसेच सर्व कर्मचार्यांचे सह्रदय आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स