ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
घावनळे विभागात विकास कामांचा धडाका ; आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने संपन्न.

घावनळे विभागात विकास कामांचा धडाका ; आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने संपन्न.

प्रकाशन: 21 Dec 2023 12:13 PM
वाचन संख्या 145

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून घावनळे विभागात अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली असून रविवारी त्यांच्या उपस्थितीत या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. ग्रामपंचायत निवडणुकीत विकास कामे मार्गी लावण्याचा आमदार वैभव नाईक यांनी दिलेला शब्द मार्गी लावला आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. यामध्ये घावनळे खुटवलंवाडी वाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख, घावनळे खोचरेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, घावनळे आईनमाळा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, घावनळे माश्याचीवाडी येथे स्ट्रीटलाईट बसविणे, मोरे गावातील बांदेकरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ३० लाख हि कामे आ. वैभव नाईक यांनी मंजूर केली असून सर्व कामांची भूमिपूजने करण्यात आली आहेत.

यावेळी मोरे येथे शिवसेना कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, रमा ताम्हाणेकर, दीपक आंगणे,रामभाऊ धुरी, अंकुश धुरी, शाखा प्रमुख प्रकाश सावंत, भाई बांदेकर, विठ्ठल दळवी, काशीराम खरुडे, सदा बांदेकर,राजू तामाणेकर,बंटी भिसे, संतोष लाड आदींसह मोरे गावातील ग्रामस्थ.

घावनळे येथे माजी सरपंच दिनेश वारंग, सरपंच आरती वारंग, शाखाप्रमुख संतोष नागवेकर, दीपक सावंत, गाव संघटक नाना कोरगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष अमोल पालव, माजी सोसायटी चेअरमन विद्यमान सदस्य जयराम सुद्रिक, युवासेना उपविभाग प्रमुख निलेश धुरी, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर जाधव,श्रद्धा तावडे, स्वरा धुरी, महादेव कोरगावकर, योगेश पारकर, प्रवीण कदम, बुवा आनंद आणि परिवार, बाळा साउळ, आनंद नेवगी, सचिन कोरगावकर, सत्यवान परब, मधु घाडी, वैभव सावंत, समीर धुरी, सत्यवान वारंग, विशाल वारंग, दिगंबर वारंग, अनील वारंग, तुळसुलकर, कोरगावकर, नेवगी, राऊळ, पारकर, आदी असंख्य पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स