ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आ. वैभव नाईक यांना भरघोस मतांनी विजयी करायचा कुसगाव ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री. चवाटेकर व ग्रामस्थांनी केला निश्चय.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आ. वैभव नाईक यांना भरघोस मतांनी विजयी करायचा कुसगाव ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री. चवाटेकर व ग्रामस्थांनी केला निश्चय.

प्रकाशन: 20 Dec 2023 02:49 AM
वाचन संख्या 161

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांचे काम संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. कुडाळ तालुक्यातील जनतेच्या कामांसाठी ते विधानसभेत भांडत आहेत. ज्या प्रमाणे ते आपल्याला सहकार्य करत आहेत. तसेच सहकार्य आपल्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आ. वैभव नाईक यांना होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कुसगाव येथील ग्रामस्थ व कुसगावचे मुंबई ग्रामविकास मंडळ हे आ. वैभव नाईक यांच्या पाठीशी खंबीर राहणार असून,भरघोस मतांनी आ. वैभव नाईक यांना विजयी करू असा निर्धार कुसगाव ग्रामविकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री चवाटेकर व कुसगाव ग्रामस्थांनी केला आहे.

आमदार वैभव नाईक यांनी गिरगाव कुसगाव येथे मंजूर केलेल्या विविध विकास कामांची भूमिपूजने रविवारी त्यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी ग्रामस्थांच्या वतीने श्री. चवाटेकर बोलत होते. आ. वैभव नाईक यांनी कुसगांव अन्नबाववाडी येथे तुकाराम आईर घराजवळ लिंगेश्वर मंदिर रस्त्यावर साकव तसेच गिरगाव कुसगाव मुख्य रस्ता ते गिरगाव रवळनाथ मंदिर जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, गिरगाव घाडीवाडी येथे विंधन विहीर ,पंप व टाकी बसविणे हि कामे मंजूर केली आहेत. त्याचबरोबर खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून कुसगाव येथे बीएसएनएल टॉवर मंजूर करण्यात आला या कामांची भूमिपूजने आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, दीपक आंगणे, विभाग प्रमुख नरेंद्र राणे, कन्याश्री मेस्त्री,संदीप सावंत,प्रदीप गावडे, मंगेश मर्गज,दिवाकर आईर, कुसगाव सरपंच सौ. सावंत,उपसरपंच संतोष सावंत, शशिकांत आचरेकर, प्रगती चवाटेकर आदींसह गिरगाव, कुसगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स