ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वैभववाडीत युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आयोजित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वैभववाडीत युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून आयोजित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.

प्रकाशन: 20 Dec 2023 02:41 AM
वाचन संख्या 172

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी प्राथमीक आरोग्य केंद्र येथे काल युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाले. काल सकाळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रवींद्र, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या शिबिराची सुरुवात झाली. यावेळी संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व जिल्ह्यात सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे युवा सेनेच्या कार्याचे कौतुक देखील केले.

वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे या शिबिराचा आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती या शिबिरात १८८ नागरिकांनी मोतीबिंदूची तपासणी केली यामध्ये मोतीबिंदू असलेले ७४ रुग्णांचे निदान झाले. या रुग्णांवर येता महिनाभरात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
शस्त्रक्रियेसाठी जाण्यासाठी गाडीची व्यवस्था, शस्त्रक्रियेनंतर लागणाराा चष्मा हे युवासेनेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे असे सुशांत नाईक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख -संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख -अतुल रावराणे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख -सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख- नंदू शिंदे, तालुकाप्रमुख -मंगेश लोके, जिल्हा कार्यकारणी सदस्य -संदीप सरवणकर ,युवासेना जिल्हा चिटणीस -स्वप्निल धुरी, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख- जावेद पाटणकर , रज्जब रमदुल, शहर प्रमुख – शिवाजी राणे, नगरसेवक -मनोज सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख- अतुल सरवटे, युवासेना तालुकाप्रमुख- रोहित पावसकर , विभाग प्रमुख- विठोजी पाटील ,अनिल नराम, यशवंत गवानकर, राजेश तावडे , गौस पाटणकर, विलास पावसकर, पांडुरंग पांचाळ, सुनील कांबळे , भीमराव भोसले , राजाराम गडकर , शाबन राऊत, समीर लांजेकर, मयूर दळवी , संतोष पाटील, महेश रावराणे , श्रीकांत डाफळे, रवींद्र रावराणे, करकोटे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स