ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माणगांव विभागातील विविध विकास कामांची आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने ; ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माणगांव विभागातील विविध विकास कामांची आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने ; ग्रामस्थांनी मानले आ. वैभव नाईक यांचे आभार.

प्रकाशन: 20 Dec 2023 02:58 AM
वाचन संख्या 182

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी माणगाव जि. प. विभागातील माणगाव व आकेरी गावात मंजूर केलेल्या विविध कामांची भूमिपूजने रविवारी त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत आभार मानले.

यामध्ये माणगांव ढोलकरवाडी ते पेडणेकरवाडी मार्ग खडीकरण डांबरीकरण करणे निधी १९ लाख,माणगाव तांबळवाडी मुख्य रस्ता ते सागर माळकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, माणगाव जोळकवाडी डोंगरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख, माणगाव डोबेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, माणगाव धुरीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी २६ लाख, आकेरी खालची गावडेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे, आकेरी गावडेवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ८.५० लाख, आकेरी ग्रामपंचायत ते राऊळवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख हि कामे आ. वैभव नाईक यांनी मंजूर केली असून या सर्व कामांची भूमिपूजने पार पडली. यावेळी माणगाव येथे शिवसेना तालुका संघटक बबन बोभाटे,उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, दिपक आंगणे,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कवीटकर, सरपंच सौ मनीषा भोसले,उपसरपंच बापू बागवे, रमाकांत तामाणेकर,माणगाव विभागप्रमुख बंड्या कुडतरकर,विभाग संघटक कौशल जोशी, उपविभागप्रमुख एकनाथ धुरी, युवासेना विभागप्रमुख रुपेश धारगळकर, ग्रामपंचायत सदस्य सौ अनुष्का तेली,सौ मनाली धुरी, श्री संदिप सावंत,कु तेजस्विनी नाईक,सौ पेडणेकर, बंटी भिसे,संजय नाईक, सचिन भिसे, संजय धुरी,कमलाकर धुरी, अजित करमळकर, सचिन तेली, साई नार्वेकर,फीदालीस डॉन्टस,गुरू माणगावकर,सचिन तेली आदि

आकेरी येथे महेश जामदार, गुरुनाथ पेडणेकर, अभय राणे, रुपेश वारंग, प्रमोद घोगळे, किरण वारंग, उमेश परब, राजेश मिस्त्री , राघोबा मिस्त्री , नाना वारंग, गिरीश सावंत, गौरीस नाईक, सूर्या घाडी, मेघा गावडे, रूपाली पेडणेकर प्राजक्ता मिस्त्री , मैत्री पालव, महादेव परब, शंकर जामदार, श्रीपाद परब, उमेश जामदार, संतोष जामदार, संतोष गावडे, अकिरकर सर यांसह शिवसेना,युवासेना महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स