ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
प्रेरणा अंतर्गत स्पर्धा परीक्षांसाठी आज फेसबुक लाईव्हद्वारा इतिहास विषयावर मार्गदर्शन.

प्रेरणा अंतर्गत स्पर्धा परीक्षांसाठी आज फेसबुक लाईव्हद्वारा इतिहास विषयावर मार्गदर्शन.

प्रकाशन: 13 Oct 2021 12:10 PM
वाचन संख्या 90
ओरोस | प्रतिनिधी : जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येत आहेत. या उपक्रमाअंतर्गत आज इतिहास विषयाची तयारी व अभ्यास करताना येणाऱ्या अडचणीवर मार्ग कसा काढावा यावर ऑनलाईन मार्गदर्शन  आज बुधवार दि. 13 ऑक्टोंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सायं. 5 ते 6 या वेळेत मार्गदर्शनाचे चौथे सत्र आयोजित करण्यात आले आहे. हे मार्गदर्शन सत्र फेसबुक लाईव्हद्वारे https://www.facebook.com/Collector-Office-Sindhudurg-01061044850492    ऑनलाईन होत आहे.

आज होणाऱ्या या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी,  नगर पंचायत वैभववाडीचे मुख्य अधिकारी, सुरज कांबळे व नगर पंचायत, दोडामार्गचे  मुख्य अधिकारी, शिवराज गायकवाड  हे अधिकारी सहभागी होणार आहेत.

तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, आत्मविश्वासाने मुलाखतीला कसे सामोरे जावे, येणाऱ्या अडचणींवर मार्ग कसा काढावा, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न, शंका यांचे निरसन केले जाणार आहे. 
यापूर्वी युपीएससी आणि एमपीएससी विषयी मार्गदर्शन सत्र संपन्न झाले आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी याचा लाभ घ्यावा.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स