ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्केच्या निवडणुकीस उच्च न्यायालयाची स्थगिती...!

सिंधुदुर्ग जिल्हा बॅन्केच्या निवडणुकीस उच्च न्यायालयाची स्थगिती...!

प्रकाशन: 13 Oct 2021 11:37 AM
वाचन संख्या 52

मतदानाचा हक्क नाकारलेल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने स्थगिती…..

ओरोस | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुचर्चित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे परंतु येत्या दोन दिवसात निर्णय होऊन पुन्हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचीही शक्यता आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मतदार यादीतून नाव डावलल्यामुळे, एका याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात मतदानाचा हक्क मिळावा म्हणून याचिका केली आहे दाखल.त्यामुळे राज्यभरातील काही जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया थांबली होती. त्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा देखील समावेशआज उच्च न्यायालयात यावर न्याय निवडा होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होईल, अशी शक्यता होती.त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक कार्यक्रमावर लक्ष लागून राहिले होते. मात्र काल उच्च न्यायालयात यावर न्यायनिवाडा झाला नाही. जोपर्यंत न्याय निवाडा होत नाही, तोपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर करु नये, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सहकार प्राधिकरणला दिला. या आदेशामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी हाती घेतला होता पण, तो आता रद्द केलाय, अशी माहिती प्रांताधिकारी वंदना करमाळे यांनी दिली आहे. तरिही दोन दिवसात याचिकेवर निर्णय होऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स