ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ करणार 10 हजार कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर निधीची उभारणी..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ करणार 10 हजार कोटी रुपयांच्या आत्मनिर्भर निधीची उभारणी..!

प्रकाशन: 13 Oct 2021 12:22 PM
वाचन संख्या 76

छोट्या उद्योगांच्या मदतीसाठी एमएसएमई मंत्री नारायण राणे यांचा पुढाकार….

नवी दिल्ली | ब्युरो न्यूज : राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ 10 हजार कोटी रुपयांचा आत्मनिर्भर निधी उभारणार आहे. यासाठी केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना विकास निधी मिळविण्यात येत असलेल्या अडचणीवर उपाययोजनेसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आत्मनिर्भर पॅकेज दिले आहे. या अंतर्गत या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या निधींसाठी एका रकमेची घोषणा केली. त्यासाठी भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या एनएसआयसी अर्थात राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ या मिनी-रत्न महामंडळाची 100% उपकंपनी असणाऱ्या एनव्हीसीएफएल या कंपनीची स्थापना करण्यात आली. एमएसएमई उद्योगांना विकास भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी निधी उभारण्यास मदत करण्याच्या उद्देशाने आणि 10,006 कोटी रुपयांचा लक्ष्यित निधीसह एनव्हीसीएफएलने आत्मनिर्भर निधीची स्थापना केली आहे.
यावेळी राणे यांनी अधिकाऱ्यांना ठामपणे बजावले की या क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली हवी आहे. त्यासाठी मंत्रालयाच्या सर्व विभागांना समन्वयाने काम करावे लागेल. समाजाचे भले करण्यासाठी मंत्रालयाने अधिक खर्च करायला हवा असे ते म्हणाले. एमएसएमई क्षेत्राच्या माध्यमातून भारताच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते आणि त्यातून अधिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न गाठणे शक्य होईल याकडे राणे यांनी लक्ष वेधले.
एनएसआयसी, एनव्हीसीएफएल आणि एसएलव्ही यांच्या अधिकाऱ्यांच्या योगदान करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री भानूप्रताप सिंग वर्मा, एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी बी स्वेन, एनएसआयसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि एनव्हीसीएफएलच्या अध्यक्ष अलका अरोरा आणि एसव्हीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष के.सुरेश या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यासाठी एसबीआयसीएपी व्हेंचर्स मर्या (एसव्हीएल) या कंपनीची गुंतवणूक व्यवस्थापन कंपनी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. एनव्हीसीएफएलची कायदेविषयक सल्लगार म्हणून खेतान आणि कंपनी काम पाहणार आहे. एनव्हीसीएफएलने सेबी अर्थात ठेवी आणि विनिमय मंडळाकडे खासगी प्लेसमेंट मेमोरँडम सादर केले असून त्यायोगे 1 सप्टेंबर http://localhost/news/public/uploads/2021 ला सेबीने एसआरआय निधीची दुसऱ्या श्रेणीच्या पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून नोंदणी केली.
आत्मनिर्भर निधी एमएसएमई क्षेत्रापुढील इक्विटी निधीच्या आव्हानाचा सामना करण्यास मदत करेल. या उद्योगांना त्यांच्या पुढील अडचणी पार करण्यासाठी आवश्यक क्षमता निर्माण करत कॉर्पोरेटायझेशनला प्रोत्साहन देईल. कमी प्रमाणात निधी मिळालेल्या सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांकडे विविध प्रकारच्या निधींचे सुरळीत मार्गीकरण करण्यात येईल.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स