शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांची आज खळा बैठक ; आमदार वैभव नाईक यांनी केले उपस्थितीचे आवाहन.
मालवण | सुयोग पंडित : शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे खळा बैठकांच्या निमित्ताने आज गुरुवारी २३ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. दुपारी १ :३० वा . बांबर्डे येथे शिवसेना महिला तालुका प्रमुख स्नेहा दळवी यांच्या घरी ते खळा बैठक घेणार आहेत. तरी यावेळी सर्व शिवसेना, युवासेना,महिला आघाडीच्या पदाधिकारी, आजी- माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)