ताज्या बातम्या
परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.

परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा.


Article image


वायरी बांध येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन.


मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण तालुक्यातल्या क्षेत्र दत्त मंदिर, वायरी बांध येथे परमपूज्य गुरुवर्य श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी साजरा करण्यात येणार आहे.


या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता परमपूज्य गुरुवर्यांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७.३० वाजता आरती व सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम होणार आहे.


परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी तसेच त्यांच्या आध्यात्मिक विचारांचा आणि भक्तीपरंपरेचा वारसा पुढे नेण्यासाठी हा पुण्यस्मरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


या धार्मिक सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहून गुरुवर्यांचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे नम्र आवाहन श्री सद्गुरू सदानंद माऊली महाराज सांप्रदाय, मालवणचे कार्याध्यक्ष कृष्णा बांदेकर यांनी केले असून भालचंद्र उर्फ बबलू राऊत यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे माहिती दिली आहे


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

पाहिजेत..!
मागील बातमी
पाहिजेत..!
पुढील बातमी नाही

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स