ताज्या बातम्या
पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा.

पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा.

Article image

माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक, अमित सामंत, अभय शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती.


कुडाळ | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या पिंगुळी गावातील शासकीय पाझर तलावाच्या अगदी काठावर एका परप्रांतीय व्यक्तीने गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू करून तेथील पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. तेथील तलाव स्वमालकीचे दाखवून त्याची जाहिरात करून प्लॉट विक्री केली जात आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे. १८५० नळधारक ग्रामस्थ या तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र या गृहनिर्माण प्रकल्पातील सांडपाणी थेट तलावात मिसळले जाणार असल्याने त्या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा असलेला मुख्य स्त्रोत प्रदूषित होणार आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार असा आरोप करून, या विरोधात पिंगुळीतील स्थानिक ग्रामस्थांनी २ नोव्हेंबर २०२६ पासून आंदोलनाचा आणि उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलन आणि उपोषणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार वैभव नाईक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्याबाबतची माहिती दिली.


यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, काँग्रेसचे विजय प्रभू, सचिन ठाकूर, बाबल गावडे, दीपक गावडे, राजेश टंगसाळी आदि उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स