ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हरी मुखे म्हणा ; श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन, पळसंब यांचा कार्तिकी एकादशी सप्ताह.

हरी मुखे म्हणा ; श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन, पळसंब यांचा कार्तिकी एकादशी सप्ताह.

प्रकाशन: 23 Nov 2023 05:49 AM
वाचन संख्या 131

गिरीधर पुजारे | विशेष सांस्कृतिक प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथे सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी सात प्रहराचा हरीनाम सप्ताह आज दिनांक २३/११/२०२३ रोजी संपन्न होत आहे. हा सप्ताह म्हटलं की बालपण आठवतं, पहिले ते एस एस सी पर्यंत शिक्षण गांवीच झाल्यामुळे गावात होणारे प्रत्येक कार्यक्रमात सहभागी असायचो. दसरा संपला कि देवीचा जागर सुरू होतो. एक महीना चाललेल्या या जागरात मुख्यता पावले नृत्य सराव आणि नवीन काहीतरी शिकायला मिळायचे. खरं पावले नृत्य म्हणजे पुर्वजानी एक व्यायामशाळा उघडली होती. शरीराला पूर्णपणे मोकळं करणं हे ह्यातून नकळत घडत होते. साधारणपणे शेतीची कामगिरी संपत आली की हे सांस्कृतिक कार्यक्रम सूरू होतात. ह्यातून मनोरंजन उत्तम आरोग्य आणि मनःशांती मिळते. कोकणात आषाढी एकादशीला तेवढं वातावरण नसते. पण कार्तिकी एकादशीला गांवागांवात प्रत्यक्ष पंढरपूर उभं राहते. याचा अनुभव मी लहाणपणापासून घेतला आहे.

साधारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गांवात हरिनाम सप्ताह वेगवेगळ्या तारखेला होतो. कुणी सात प्रहर कुणी सात दिवस करतात. मग वारकरी मंडळी ह्या गावातून दुसर्‍या गांवात हरिनाम सेवा करायला जात असतात. आता पूर्वीपेक्षा सुखसोई वाढल्या त्यामुळे नवीन पिढी खूप उत्साहात साजरा करायला लागली. पावले नृत्यात ही आमुलाग्र बदल झाला आहे. खरं मिडियाने हे नृत्य आवर्जून पहावे, म्हणजे ह्या कलेला एक उच्च असे व्यासपीठ मिळेल. तसे गावागावात स्पर्धा भरवतात पण ती त्यापूर्ती मर्यादित राहते. हरिनाम सप्ताह मुळे जून्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून हे शब्दबद्ध केले. श्री विठ्ठल रखुमाई आणि श्री आई जयंती देवी रवळनाथ चरणी प्रार्थना करतो कि त्यांनी सर्व भक्तांना सुखसमृद्धी निरोगी आरोग्य आणि शिक्षण या सर्व गोष्टीचे आशिर्वाद ध्यावे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 445

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स