ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
आंगणेवाडीतील नृत्य स्पर्धेत समर्थ गवंडी अव्वल.

आंगणेवाडीतील नृत्य स्पर्धेत समर्थ गवंडी अव्वल.

प्रकाशन: 23 Nov 2023 06:56 AM
वाचन संख्या 71

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या मंदिराच्या सुवर्णकलश स्थापना वर्धापन दिनानिमित्त आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीनेआयोजित जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेमध्ये रेडी येथील समर्थ गवंडीने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेमध्ये एकूण ३० स्पर्धक सहभागी झाले होते. द्वितीय क्रमांक विभागून नंदिनी बिले सावंतवाडी आणि प्रेयश पवार कणकवली यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक मृणाल सावंत (पिंगुळी) नेहा जाधव (इन्सुली ) यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ निधी खडपकर (सावंतवाडी) यांची निवड करण्यात आली. बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना काका आंगणे म्हणाले, स्थानिक मुलांना तसेच जिल्ह्यातील गुणवंत मुलांना नृत्याच्या माध्यमातून कलेचे दालन खुले व्हावे. या सर्वांना आपल्या कलागुणांना वाव देता यावा म्हणून आंगणे कुटुंबीयांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. यापुढेही विविध स्तरातील जिल्ह्यातील मुलांना पुढे आणण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आंगणेवाडीत घेतल्या जातील.

स्पर्धेचे परीक्षण श्री सिद्धेश पालव आणि चेतन हडकर यांनी केले. सर्व विजेत्यांना रोख रक्कम आणि भव्य चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. बक्षिस वितरण प्रसंगी आंगणेवाडी नाट्य मंडळाचे अर्जुन उर्फ काका आंगणे, सुनील आंगणे, दिनेश आंगणे,समीर आंगणे, पपू आंगणे,बाबू आंगणे,विद्या आंगणे, नंदू आंगणे, सतीश आंगणे, पंकज आंगणे, संतोष आंगणे, गणेश आंगणे, अनिल पालव, सुधा आंगणे,सचिन आंगणे,तनुराज आंगणे, कुणाल आंगणे, विनोद आंगणे, अक्षय आंगणे, संजय आंगणे, संतोष आंगणे, प्रथमेश आंगणे, पंकज आंगणे, निशिकांत आंगणे,शशी आंगणे, बाळा आंगणे, दिनेश आंगणे, संकेत आंगणे, देवेंद्र आंगणे, कुणाल आंगणे, जयवंत आंगणे, अमोल आंगणे, प्रतीक आंगणे, महेश आंगणे, प्रसाद आंगणे, समीर आंगणे, सागर आंगणे,विनायक आंगणे, प्रकाश आंगणे आणि आंगणेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन उर्फ बाबू आंगणे यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स