केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय.
केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय.
सी एम चषक ४१ वी युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप.
क्रीडा | ब्यूरो न्यूज : पुण्यात, बुधवारी २८ ऑक्टोबर रोजी झालेल्या सीएम चषक ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिपमध्ये सुभद्रा जयकुमार (१७) आणि अण्णा मारियाम (१३) यांनी योग्य वेळी बास्केट करून केरळच्या मुलींनी पुनरागमन करत गतविजेत्या आणि यजमान महाराष्ट्रावर ६२-४५ असा मोठा विजय मिळवला. मध्यंतराला एका गुणाने मागे पडल्यानंतर, केरळच्या मुलींनी बाजी पलटवून महाराष्ट्रावर तब्बल १७ गुणांनी विजय मिळवला. प्रत्येक क्वार्टरमधील केरळच्या बाजूने निकालाची नोंद १४-१४, १२-१३, १४-१०, २२-८ अशी होती.
एका रोमांचक सामन्यात, निर्धारित वेळेच्या अखेरीस दोन्ही संघांनी ७० गुण मिळवल्यानंतर, तेलंगणाने अतिरिक्त वेळेत उत्तर प्रदेशवर ७४-७१ अशा तीन गुणांनी मात केली. तेलंगणाकडून सान्वी कोलिसेट्टीने सर्वाधिक २४ गुण मिळवले. उत्तर प्रदेशकडून प्रिया राणाने १८ गुण मिळवले.
निकाल
मुली : तेलंगणा (सानवी कोलिसेट्टी २४) बीटी उत्तर प्रदेश (प्रिया राणा १८) ७३-७० (२०-१६, १०-१५, २३-२२, १६-१६ ओटी ४-१); केरळ (सुभद्रा जयकुमार १७, अण्णा मरियम १३) बीटी महाराष्ट्र (ध्रुवी पिसाळ ९, सिया भोसले ९) ६२-४५ (१४-१४, १२-१३, १४-१०, २२-८)
मुले : उत्तर प्रदेश (तेजस बालियान २९) बीटी गुजरात (अमित सारिया २५) ८८-४८ (२१-१४, २१-१५, १९-१३, २८-६); राजस्थान (हिमांशू २९, अक्षय नायक १६) बीटी हरियाणा (शिवम १७) ८९-१३ (२५-११, २०-१५, १६-२१, २८-३६); तामिळनाडू (सर्वेश रघु २३, फ्योडोर अथिथन १९) बीटी केरळ (अल्ड्रिन अँटो ॲलेक्स २२) ८८-५६ (२३-१३, २३-१८, २१-१९, १९-९).
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!'
रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या मुलींची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड.
रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या मुलींची विभाग...