ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन.

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन.

प्रकाशन: 12 Nov 2023 06:11 AM
वाचन संख्या 118

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या बॅ नाथ पै सेवांगण, कट्टा येथे दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरवण्यात आले. इंडिया प्रिटिंग वर्क्स मुंबई या मुद्रणालयाचे व इंकींग इनोव्हेशन या प्रकाशन संस्थेचे प्रमुख श्री आनंद लिमये यानी वाचकांना वितरीत करण्यासाठी दिलेल्या अंकांचे यावेळी प्रदर्शन करण्यात आले.
सर्वच दिवाळी अंक दर्जेदार असून वाचकांनी या दिवाळी अंकांचे वाचन करावे असे आवाहन किशोर शिरोडकर
यांनी केले.

पुरुष स्पंदन, विजानधारा, धनंजय, कथाश्री, नवल मोहिनी, एबीपी माझा, अक्षरगंध या सारखे अनेक दर्जेदार अंक श्री आनंद लिमये यानी उपलब्ध करून दिले आहेत. वाचकांना या दिवाळी अंकांचे वितरण करण्यात आले. यावेळी किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, सुजाता पावसकर, श्रीमती पोखरणकर, कुमारी वाईरकर, श्रीधर गोंधळी व वाचक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स