दीपक भोगटे व परिवाराचा प्रा. मधु दंडवते यांना दिलसे 'कंदिल दंडवत…!'
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा येथील समाजशील व्यक्तिमत्व श्री दिपक भोगटे यांनी आज दिवंगत रेल्वे व अर्थमंत्री खासदार प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतीदिनी म्हणजे आज एक अनोखा ‘कंदिल दंडवत’ समर्पित केला आहे.
दिपक भोगटे.
१९७७ साली दिपक भोगटे यांनी पहिला कंदील केलेला तो होता
‘नांगरधारी शेतकरी’ चिन्ह असलेला कंदील. गेली ४६ वर्षे ते दिवाळीला स्वतः कंदील करतात एखादा वर्तमान विषय घेऊन त्यावर ते कंदिलाची बांधणी करतात.
यंदाचे वर्ष हे प्रा मधु दंडवते यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यांचा स्मृतिदिन सुद्धा आज १२ नोव्हेंबरलाच आहे हा ही योगायोग..! त्यांना अभिवादन म्हणून यंदाचा
दिवाळी कंदील . विशेष म्हणजे ४६ वर्षापूर्वीचा नांगरधारी शेतकरी सुद्धा यंदाच्या त्यांच्या कंदिलावर आहे.
प्रा. मधु दंडवते हे प्रचंड प्रसन्न सर्जनशील म्हणून सुप्रसिद्ध होतेच त्यामुळे दिपक भोगटे यांचा हा ‘दिलसे कंदिल’ प्रा. मधु दंडवते यांच्या स्मृतीदिनी खरा भाव दंडवत ठरतोय.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)