ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपचे युवा नेते व उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस सोहळा आठवडाभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार साजरा ; प्रसिद्ध कीर्तनकार प.पू. इंदूरीकर महाराज, पॉप सिंगर जुबिन नौटियाल आणि सिने अभिनेता क्रांती मळेगांवकर यांची असेल विशेष उपस्थिती.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपचे युवा नेते व उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस सोहळा आठवडाभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी होणार साजरा ; प्रसिद्ध कीर्तनकार प.पू. इंदूरीकर महाराज, पॉप सिंगर जुबिन नौटियाल आणि सिने अभिनेता क्रांती मळेगांवकर यांची असेल विशेष उपस्थिती.

प्रकाशन: 29 Sep 2023 09:13 AM
वाचन संख्या 235

९ ऑक्टोबरला माजी खासदार डाॅ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत सोहळ्याचा होणार शुभारंभ ; १५ ऑक्टोबरला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह दिग्गजांनी उपस्थिती.

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
भाजपचे युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल प्रभाकर परब यांचा वाढदिवस ९ ते १५ ऑक्टोबर असा आठवडाभर विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी दणक्यात साजरा होत आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी,कुडाळ व दोडामार्ग या ठिकाणी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पॉप सिंगर जुबिन नौटियाल यांच्यासह प.पू.इंदुरकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ता सामंत यांनी सावंतवाडी येथील शिल्पग्राम येथील आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजपचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष दादा साईल, जिल्हा उपाध्यक्ष बाळु देसाई, माजी नगरसेवक मनोज नाईक, कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश मोर्ये, रुपेश कानडे, बंड्या सावंत असे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

तर या वाढदिवस सोहळयाचा शुभारंभ कुडाळ येथे ९ ऑक्टोबर रोजी माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता इंदुरकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. तर ११ तारखेला दोडामार्ग येथे सिने अभिनेता क्रांती मळेगांवकर यांच्या उपस्थितीत ‘न्यू होम मिनीस्टर’ खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. १३ ऑक्टोबरला वेंगुर्ले येथील कॅम्प स्टेडीयम मध्ये भव्य दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा समारोप १५ ऑक्टोबरला सावंतवाडी येथे होणार आहे. वाढदिवसाच्या मुख्य कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण तसेच जिल्ह्यातील भाजपाच्या प्रमुख दिग्गजांची उपस्थिती असणार आहे.

सायंकाळी ७ वाजता पॉप सिंगर जुबिन नौटियाल यांचा लाईव्ह गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी आणि विशाल परब यांच्या चाहत्यांनी उपस्थित राहुन आनंद घ्यावा असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री.दत्ता सामंत यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स