कणकवली तालुका शिवसेना नवरात्र उत्सव मंडळ अध्यक्षपदी रामू विखाळे तर खजिनदारपदी प्रमोद मसुरकर यांची निवड.
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख संदेश पारकर व आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाची बैठक आज शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर व आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयभवन येथे संपन्न झाली. नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी रामू विखाळे तर खजिनदार पदी प्रमोद मसुरकर यांची निवड करण्यात आली. जिल्हाप्रमुख संदेश पारकर व आमदार वैभव नाईक यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, सचिन सावंत, राजू राणे, भालचंद्र दळवी, महेश कोदे, रुपेश आमडोस्कर, दिव्या साळगांवकर, माधवी दळवी, विलास गुडेकर, सचिन आचरेकर, संजय पारकर, रोहित राणे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)