'वर्षा' या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी श्री गणरायांना भक्तिभावाने निरोप ; पर्यावरणपूरक कुंडात केले 'श्रीं' च्या मूर्तीचे विसर्जन.
मुंबई | ब्युरो न्यूज : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ अशा गजरात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला भक्तीपूर्ण निरोप देण्यात आला.
निवासस्थानाच्या आवारात पर्यावरणपूरक पद्धतीने निर्माण केलेल्या कृत्रिम कुंडात श्रींच्या मूर्तीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ‘श्रीं’ च्या मूर्तीचे काल २८ सप्टेंबरला विधिवत विसर्जन करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)