ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दोन वेळा निवडून दिलेल्या जनतेच्या विकासाच्या सर्व मागण्या पूर्णत्वास नेणार : आमदार वैभव नाईक.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दोन वेळा निवडून दिलेल्या जनतेच्या विकासाच्या सर्व मागण्या पूर्णत्वास नेणार : आमदार वैभव नाईक.

प्रकाशन: 10 Sep 2023 10:05 AM
वाचन संख्या 115

जांभवडे, भडगांव, पांग्रड, कडावल गावात आमदार वैभव नाईक यांचा गावभेट दौरा ; ग्रामस्थांशी सकारात्मक चर्चा संपन्न.

कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातल्या जांभवडे, भडगांव, पांग्रड, कडावल गावात आमदार वैभव नाईक यांनी गावभेट दौरा केला. यावेळी गांवात बैठका आयोजित करून आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. गांवातील पूर्ण कऱण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालूका संघटक बबन बोभाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, जनतेने माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकावर विश्वास ठेवून दोन वेळा निवडून दिले. मतदारसंघात जनतेला अभिप्रेत असलेला विकास करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामे करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्हावासियांचे स्वप्न असलेले शासकीय मेडिकल कॉलेज, कुडाळ महिला बाल रुग्णालय सुरु झाले असून जनतेला याचा लाभ होत आहे. यापुढेही ग्रामस्थांच्या विकासाच्या ज्या काही मागण्या असतील त्या सर्व पूर्णत्वास नेल्या जाणार आहेत.पुढील वर्षे निवडणुकांचे असणार आहे. त्यामुळे सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी संघटना वाढीवर भर द्यावा असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी केले.

याप्रसंगी जांभवडे येथे उपतालुका प्रमुख महेश सावंत, युवासेना विभाग प्रमुख निशांत तेरसे,शाखा प्रमुख तेजस भोगले, ग्रा. प. सदस्य उदय मडव,सोनवडे सोसा. चेअरमन काशीराम घाडीगावकर, माजी सरपंच विठ्ठल तेली, दत्तप्रसाद मेस्त्री, मधुकर पाटील, दिलीप सावंत, रविकांत खांडेकर, विजय पतियाणे, मोहन सुर्वे,आप्पा रेडकर, पंढरी राणे,

भडगांव येथे उपसरपंच बाबी गुरव, श्रीनिवास नाईक, कृष्णा घाडी,समीर लोट,आनंद लोट, राजू लोट, ताता सावंत, अरुण माळकर, हेरंब सामंत,राजाराम गुरव, जनार्दन गुरव, सुनील गुरव, सुहास गुरव, तेजस माळकर,संतोष ढोकरे, अरविंद बागवे,पांडुरंग लोट,दाजी लोट, सोनाली सावंत,स्नेहल नाईक, संतोष सावंत.

पांग्रड येथे उपविभाग प्रमुख मंगेश मर्गज, शाखा प्रमुख विश्वनाथ मर्गज,उपशाखा प्रमुख संजय कदम, ग्रा.प. सदस्य मनीषा मर्गज, पल्लवी मर्गज,तंटामुक्ती अध्यक्ष शरद मर्गज,आनंद मर्गज,सुरेश मर्गज,सदानंद तावडे, जनार्दन मर्गज,पुरुषोत्तम मर्गज, यशवंत तांबे.

कडावल येथे विभाग प्रमुख नरेंद्र राणे, सरपंच शीतल कल्याणकर, ग्रा. प. सदस्य विजय गावठे,व्यापारी संघाचे अध्यक्ष गुरु मुंज, विलास गुरव, विद्याधर मुंज, राजेंद्र मुंज,गुरुनाथ मुंज,विष्णू गुरव,सहदेव गुरव,भाई गुरव आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स